भुसावळात नो व्हेईकल झोन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 21:54 IST2020-07-25T21:52:42+5:302020-07-25T21:54:00+5:30
आता सोमवारपासून ‘नो व्हेईकल झोन’ बंद होणार आहे.

भुसावळात नो व्हेईकल झोन रद्द
भुसावळ : सक्तीच्या लॉकडाऊनंतर बाजारात गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आले होते, मात्र ज्या हेतूने ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आले होते, मुळात तो हेतू साध्य होत नसल्याचे चित्र शहरात दिसून आले. आता सोमवारपासून ‘नो व्हेईकल झोन’ बंद होणार आहे.
‘नो व्हेईकल झोन’चा आदेश रद्द करून मुभा दिल्याने हातगाडीचालक व व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य बाजारपेठ असल्याने त्यांच्या व्यवसायात तेजी येणार आहे.
जनजीवन पूर्वपदावर येण्यास यामुळे सुरुवात मदत होणार आहे. दरम्यान, नियोजनाअभावी ‘नो व्हेईकल झोन’मध्ये बांबू, बॅरिकेट्स लावून रस्ते अडविले गेल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही मोठा त्रास सोसावा लागत होता.