उत्तर महाराष्टÑात एकही जागा धोक्यात नाही - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:11 IST2019-04-09T13:11:12+5:302019-04-09T13:11:45+5:30

सर्व आठ जागांवर विजयी होणार

No one is in danger in North Maharashtra - Girish Mahajan | उत्तर महाराष्टÑात एकही जागा धोक्यात नाही - गिरीश महाजन

उत्तर महाराष्टÑात एकही जागा धोक्यात नाही - गिरीश महाजन

नंदुरबार : उत्तर महाराष्टÑातील एकाही जागेला धोका नाही. सर्वच आठ जागा भाजप महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबारात व्यक्त केला.
डॉ.हिना गावीत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नंदुरबारसह नाशिक विभागातील सर्वच आठ जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत.
कुठल्याही सर्व्हेचे अंदाज खोटे ठरवत सर्वच आठ जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत.
सद्य स्थितीत एकही जागा धोक्याची नाही. महायुतीचे सर्वच पदाधिकारी एकदिलाने काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.
कुणीही नाराज नाहीत. आज एकीचे प्रदर्शन झाले आहेच. राज्यात देखील अनेक धक्कादायक निकाल लागून विरोधकांचा सफाया या निवडणुकीतून होणार असल्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Web Title: No one is in danger in North Maharashtra - Girish Mahajan

टॅग्स :Jalgaonजळगाव