भडगाव : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्या निवडणुका घेण्यात येऊ नये, असे निवेदन भडगाव भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. जोपर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष किरण शिंपी, सांस्कृतिक आघाडीचे बापू वाघ, दिव्यांग आघाडीचे सुरेश मराठे, बन्सीलाल परदेशी, भास्कर शार्दुल, प्रमोद देवीदास पाटील, अनु.जमाती मोर्चा सरचिटणीस नामदेव मालचे, सुभाष मोरे, सोशल मीडियाप्रमुख शुभम सुराणा, युवा वॉरिअर्स सरचिटणीस कुणाल पाटील, ओबीसी मोर्चाचे सुनील परदेशी, वसंत वाघ, विशाल चौधरी, सूर्यभान वाघ, नीळकंठ खैरनार, योगेश पाटील आदी उपस्थित होते.