निशामने दिले प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:27+5:302021-09-02T04:37:27+5:30

त्यांच्यासाठी मी महत्त्वाचा नाही - रूट लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने नुकतेच म्हटले होते की, जोपर्यंत ...

Nisham replied | निशामने दिले प्रत्युत्तर

निशामने दिले प्रत्युत्तर

त्यांच्यासाठी मी महत्त्वाचा नाही - रूट

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने नुकतेच म्हटले होते की, जोपर्यंत रूटच्या नेतृत्वात इंग्लंड ऑस्ट्रेलियाला ॲशेज मालिकेत पराभूत करत नाही तोपर्यंत त्याला महान कर्णधार मानणार नाही. त्यावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने आता उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, काही लोक असा विचार करतात की मी कर्णधार म्हणून महत्त्वाचा नाही.’ रूट हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने २७ कसोटी विजय मिळवले.

अँडरसन अनोखा स्विंग बॉलर - इयान

लंडन : जेम्स अँडरसन हा अनोखा स्विंग बॉलर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली हा त्याच्या जाळ्यात अडकतो, त्याला तो वगळू शकत नाही, असे मत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे. चॅपेल यांनी अँडरसनचे कौतुक केले आहे. या मालिकेत अँडरसनने कोहलीला दोन वेळा बाद केले आहे.

भारत ऑस्ट्रेलियन ब्रॅण्डचे क्रिकेट खेळतो - कॉलिंगवुड

लंडन : विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ त्याच प्रकारचे क्रिकेट खेळत आहे ज्या प्रकारचा खेळ ऑस्ट्रेलियन संघ दाखवत होता, असे मत इंग्लंडचे सहायक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवुड यांनी व्यक्त केले. कॉलिंगवुड यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून क्रिकेट बदलले आहे.’ भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये लॉर्ड्स कसोटीत शाब्दिक वाददेखील झाला होता.

Web Title: Nisham replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.