जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 21:07 IST2020-05-06T21:07:44+5:302020-05-06T21:07:56+5:30

जळगाव - जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 ...

Nineteen more corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले


जळगाव- जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 85 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली.

 

Web Title: Nineteen more corona infected patients were found in Jalgaon district