जिल्ह्यात आढळले नऊ कोरोना बाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:03 IST2020-05-17T20:02:56+5:302020-05-17T20:03:12+5:30

कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 266

Nine corona-infected patients found in the district | जिल्ह्यात आढळले नऊ कोरोना बाधित रूग्ण

जिल्ह्यात आढळले नऊ कोरोना बाधित रूग्ण

जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे तीन, चोपड्याचे चार तर जळगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 266 झाली आहे.

Web Title: Nine corona-infected patients found in the district