दुसºया दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:05+5:302020-12-04T04:44:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून सलग दुसºया दिवशीही अतिक्रमण निर्मुलन मोहीम जोरात राबविण्यात आली. मनपा ...

दुसºया दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून सलग दुसºया दिवशीही अतिक्रमण निर्मुलन मोहीम जोरात राबविण्यात आली. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४८ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला असून, गणेश कॉलनी चौक, बळीराम पेठ, सुभाष चौक, फुले मार्केट, चित्रा चौक परिसरात मनपाकडून कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान काही हॉकर्सने मनपा कर्मचाºयांशी वाद घातला. मात्र, विरोध झुगारत मनपाने कारवाई सुरुच ठेवत फुले मार्केट परिसरत पुर्णपणे अतिक्रमण मुक्त केला.
मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून गेल्या आठवडाभरापासून जोरदार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी देखील सकाळी ११ वाजेपासून शहरातील विविध भागात कारवाईची मोहीम सुरु ठेवण्यात आली. कारवाईदरम्यान बुधवारीही मनपा कर्मचारी व हॉकर्समध्ये शाब्दिक वाद झाले. तसेच मनपाचे पथक पोहचल्यानंतर हॉकर्सची पळापळ देखील पहायला मिळाली. अतिक्रमण विभागा व हॉकर्समध्ये लपंडावाचा खेळ देखील पहायला मिळाला. मनपाचे पथक फुले मार्केटमध्ये कारवाईला गेल्यानंतर सुभाष चौकातूनहॉकर्स पुन्हा दुकाने थाटायची, तर सुभाष चौकात पथक पोहचल्यानंतर फुले मार्केटमध्ये पुन्हा दुकाने थाटली जात होती. यामुळे मनपाच्या दोन पथकांकडून वेगवेगळ्या भागात कारवाई झाल्यानंतर फुले मार्केटसह इतर भागातील अनधिकृत हॉकर्सने बुधवारी दुपारनंतर आपली दुकाने थाटलीच नाही. तसेच मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी भंगार बाजार परिसरातही पाहणी केली.. या दरम्यान, काही जणांनी बुधवारीही दुकाने थाटल्यानंतर त्यांच्यावरही मनपाने कारवाई केली. गणेश कॉलनी परिसर व पिंप्राळा बाजार परिसरातही मनपाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. यासह पिंप्राळा बाजारात मास्क न लावणाºयांना समज देण्यात आली.