सोशल मीडियावर पल पल की खबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 15:30 IST2018-02-04T15:30:02+5:302018-02-04T15:30:07+5:30

सोशल मीडियावर पल पल की खबर
वासेफ पटेल / ऑनलाईन लोकमत
पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात विदेशातीलही समाज बांधवांनी हजेरी लावली आहे. 34 वर्षांनंतर प्रथमच होणा:या महाअधिवेशनात समाज बांधवांनी सोशल मीडियाद्वारे अधिवेशनातील नियोजनासह छोट्या छोट्या घडामोडींची ‘पलपल कि खबर’ व्हॉटस् ग्रुप , फेसबूक सोशल मीडियाद्वारे समाज बांधवाना पयर्ंत पोहचवत आहे.
यासाठी युवक वर्गाने पुढाकार घेतला असून कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी मार्गदर्शन केले जात आहे प्रामुख्याने जेवण व्यवस्था ,पाकिर्ंग व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आदीचा समावेश आहे.