भुसाळात सापडले नवजात अर्भक
By Admin | Updated: April 20, 2017 12:33 IST2017-04-20T12:33:58+5:302017-04-20T12:33:58+5:30
भुसावळ शहरातील इदगाह मैदाना जवळ चार ते पाच दिवसांचे अर्भक गुरूवारी सकाळी 11 वाजता आढळले.
भुसाळात सापडले नवजात अर्भक
भुसावळ : शहरातील इदगाह मैदाना जवळ चार ते पाच दिवसांचे अर्भक गुरूवारी सकाळी 11 वाजता आढळले. सकाळी इदगाह मैदान परिसरात नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज स्थानिक नागरिकांना आला. त्यांनी ही बाब अन्य नागरिकांना सांगितली. बाळ जिवंत असल्याने त्याबाबत नागरिकांनी भुसावळ पोलीस तसेच नगरपालिका रुग्णालयात माहिती दिली. त्यानुसार 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेतील डॉक्टर व कर्मचा:यांनी अर्भकाला ताब्यात घेत ते जिल्हा रुग्णालयाकडे रवाना झाले. नवजात अर्भक कुणी आणून टाकले याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस शोध घेत आहेत.