नव्या अधिष्ठांतांनी घेतली कॉलेज कौन्सिलची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:49+5:302021-09-14T04:19:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी पदभार घेतल्यानंतर सोमवारी ...

नव्या अधिष्ठांतांनी घेतली कॉलेज कौन्सिलची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी पदभार घेतल्यानंतर सोमवारी दुपारी १ वाजता कॉलेज कौन्सिलची बैठक घेऊन सर्व विभाग प्रमुखांशी ओळख परिचय करून घेतला, अर्धा तास ही बैठक चालली.
मिळालेल्या माहितीनुसार अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांनी बैठकीबाबत रविवारीच संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी ही बैठक बोलावली. दरम्यान, सर्व विभागांच्या काय कमतरता आहे हे ही त्यांनी समजून घेतले. यात विविध विभागप्रुखांनी रिक्तपदांबाबतचाच प्रश्न मांडला. सर्वांच्या सहकार्याने उत्तम काम करू, असा विश्वास डॉ. फुलपाटील यांनी बैठकीत व्यक्त केला.
कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या
डॉ. फुलपाटील यांनी पदभार घेतल्यानंतर अगदी सुरुवातीला टपालावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आस्थापनाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी नियमित प्रशासकीय कामे बघितली. यात विविध अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
सुरक्षा रक्षकांची धावपळ
डॉ. फुलपाटील यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांच्या दालनाबाहेर एकही सुरक्षा रक्षक नव्हते. सुरक्षा रक्षक हे डॉ. रामानंद यांच्या निवासस्थानाबाहेर थांबून होते. अचानक काही राजकीय पदाधिकारी आल्यानंतर सुरक्षा रक्षक अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर धावत आले. नेमके जायचे कुठे हा? प्रश्न त्यांच्यासमोर असल्याने सकाळी तासभर हा गोंधळ होता.