नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:34 IST2020-06-19T12:34:39+5:302020-06-19T12:34:48+5:30
जळगाव : जळगावचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांनी गुरुवार, १८ जून रोजी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ...

नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पदभार स्वीकारला
जळगाव : जळगावचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांनी गुरुवार, १८ जून रोजी पदभार स्वीकारला.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून राऊत यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह महसूल, आरोग्य व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.