अ‍ॅट्रॉसिटीचा तटस्थपणे तपास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:23 IST2020-02-09T16:22:53+5:302020-02-09T16:23:42+5:30

वकील संघाचे सदस्य ईश्वर जमादार यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील संघाने शनिवारी पोलीस निरीक्षकांना तटस्थपणे तपासाचे निवेदन दिले.

Neutralize Atrocity | अ‍ॅट्रॉसिटीचा तटस्थपणे तपास करा

अ‍ॅट्रॉसिटीचा तटस्थपणे तपास करा

ठळक मुद्देजामनेरला वकील संघाचे पोलिसांना निवेदनजमादार यांच्याविरोधातील गुन्हा खोटा

जामनेर, जि.जळगाव : येथील वकील संघाचे सदस्य ईश्वर जमादार यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील संघाने शनिवारी पोलीस निरीक्षकांना तटस्थपणे तपासाचे निवेदन दिले.
जमादार यांच्याविरुद्ध ६ फेब्रुवारीला अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी व जमादार यांनी २९ जानेवारीला परस्पराविरुद्ध अदखलपात्र तक्ररी दाखल केल्या आहेत.
जमादार यांच्याविरोधातील गुन्हा खोटा असल्याचे निवेदनात म्हटले असून तटस्थपणे तपासाची मागणी केली आहे. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील पाटील, सचिव अ‍ॅड.ज्ञानेश्वर राजपूत, अ‍ॅड.अशोक डोल्हारे, अ‍ॅड.शिवाजी सोनार. अ‍ॅड.प्रकाश पाटील, अ‍ॅड.प्रमोद सोनार, अ‍ॅड.प्रदीप शुक्ल, अ‍ॅड.बापू बाविस्कर, अ‍ॅड.किशोर राजपूत यांनी निवेदन दिले.

Web Title: Neutralize Atrocity