गोळेगावाला पायी जाणाऱ्यांना नेरी पोलिसांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:29 IST2020-03-30T15:29:04+5:302020-03-30T15:29:54+5:30
गोळेगाव येथे पायी जात असलेल्या कुटुंबास नेरी येथील पोलिसांनी मदत केली.

गोळेगावाला पायी जाणाऱ्यांना नेरी पोलिसांची मदत
ठळक मुद्देसुरुवातीला केली विचारपूसफर्दापूरला जाणाºया वाहनात दिले बसवून
जामनेर : जळगाव येथून औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव येथे पायी जात असलेल्या कुटुंबास नेरी येथील पोलिसांनी मदत केली. सुरुवातीला पोलिसांनी अडवून विचारपूस केली. वाहनाची सुविधा नसल्याने पायी जात असल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांना नाष्टा देवून फर्दापूरला जात असलेल्या खासगी वाहनात बसवले. पोलीस उपनिरीक्षक युवराज अहिरे, राहुल पाटील, अरविंद मोरे, हरीश पवार, हंसराज वाघ, जितू ठाकरे, मुकेश आमोतकर यांनी सहकार्य केले.