शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नेहते ग्रा. पं. कार्यालयाला सरपंचासह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:34 IST

रावेर तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवकांची सातत्याने गैरहजेरी त्यात सदर ग्रामसेवक स्वातंत्र्य दिनालादेखील गैरहजर राहिल्याचा राग आल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुलूप ठोकल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे ग्रामसेवकाच्या गैरहजेरीचा आणि मनमानीबाबत उद्रेक वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याचा संताप

रावेर जि. जळगाव : तालुक्यातील नेहते येथील ग्रामसेवक मराठे हे सातत्याने गैरहजर राहत असून ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक देत मनमानी करीत असल्यासंबंधी अनेकदा तक्रारी करूनही गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने तसेच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळ्याला ग्रामसेवक अनुपस्थित राहिल्याचा राग आल्याने सरपंच महेंद्र पाटीलसह संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना बुधवारी घडली.पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एच. एन. तडवी यांच्याकडे १० रोजी दिलेल्या तक्रारी निवेदनात ग्रामसेवक हे तीन गावांचा पदभार असल्याचे सांगून सतत गैरहजर राहत असल्याचे नमूद केले असून विकास कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. शतकोटी वृक्ष लागवड, भारत स्वच्छता अभियान तथा ग्रा. प.ं ची २० लाख रुपयांची थकीत करवसुलीकडे दुर्लक्ष होत असून यासह विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र गटविकास अधिकारी यांनी दखल न घेतल्याने व ग्रामसेवक हे स्वातंत्र्य दिनाला ही अनुपस्थित राहिल्याचा राग आल्याने सरपंच महेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला स्वातंत्र्यदिनी कुलूप ठोकले. यावेळी त्यांच्यासोबत महेंद्र कोळी, रवींद्र वैदकर, पंडीत कोळी, गोकुळ महाजन, प्रल्हाद काकडे, गणेश वाघ, सुधाकर वाघ, मनोज कचरे, विश्वास काकडे आदी ग्रा पं सदस्य व ग्रामस्थांचा समावेश होता. 

टॅग्स :agitationआंदोलन