जमिनीच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:17 IST2019-12-05T19:15:22+5:302019-12-05T19:17:16+5:30
जमिनीचे आरोग्य ठणठणीत असेल तर सकस उत्पन्न मिळते. हे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी केवळ शेतक-यांची नव्हे तर आपल्या सर्वांची आहे.

जमिनीच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज
चाळीसगाव, जि.जळगाव : जमिनीचे आरोग्य ठणठणीत असेल तर सकस उत्पन्न मिळते. हे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी केवळ शेतक-यांची नव्हे तर आपल्या सर्वांची आहे. आपण मातीचे पूजक आहोत. श्रमसाधनेने निर्सगही प्रसन्न होऊ शकतो. जागतिक मृदादिनी जमिनीचे आरोग्य जपण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असा संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे साधला.
गुरुवारी जागतिक मृदादिनानिमित्त जनजागृती सोहळा पंचायत समिती मध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आयोजन पं.स.च्या कृषी विभागामार्फत करण्यात आले होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी सी.डी. साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी अजय पवार, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार, तंत्र सहाय्यक ए.आर.चंदिले, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश महाजन, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, भय्यासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुढील वर्षी मृदा संवर्धन सेवकांचा सत्कार करणार
पुढे बोलतांना आमदार चव्हाण म्हणाले की, माती प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही. मातीचा एक एक कण तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात . सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रीय शेतीचा आग्रह धरला पाहिजे. रासायनिक तत्वांचा वापर कमी करावा. माती साक्षरतेशिवाय हे शक्य नाही. कृषी विकासासाठी चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार असून पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणात मृदा दिन करण्यात येईल.