शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

‘मधुकर’ भाडेतत्त्वावर देण्यासाठी वेगवान हालचालींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 3:59 PM

मधुकर सहकारी साखर कारखाना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी वेगवान हालचाली होण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे‘मधुकर’ - सद्य:स्थिती व दावे-प्रतिदावेसर्वसाधारण सभा प्रस्ताव पाठवला आहे -चेअरमन शरद महाजनभाडेतत्त्वाच्या प्रक्रियेला वर्षभरापूर्वीच सुरुवात करणे गरजेचे होते -संचालक नितीन चौधरी

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखाना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी वेगवान हालचाली होण्याची आवश्यकता आहे. तरच कामगारांसह सर्व संबंधितांची देणी देवून कारखाना पूर्ववत होण्यासाठी मदत होणार आहे. सर्वसाधारण सभा प्रस्ताव संबंधितांकडे पाठवला आहे, असे कारखान्याचे चेअरमन शरद महाजन म्हणतात, तर संचालक नितीन चौधरी म्हणतात, भाडेतत्त्वाच्या प्रक्रियेला वर्षभरापूर्वीच सुरुवात करणे गरजेचे होते.’सर्वसाधारण सभा प्रस्ताव पाठवला आहे -चेअरमन शरद महाजनमधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडलाय. प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सर्वसाधारण सभेच्या कार्योत्तर परवानगीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविले आहे तर भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाकडूनही राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती चेअरमन शरद महाजन यांनी दिलीजळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याला सध्या ग्रहण लागले आहे. ‘मधुकर’ला मार्च २०१९ अखेर ७६ कोटींची देणी होती. ती आता ८० ते ८५ कोटींपर्र्यंत झाली आहे. त्यात बँक देण्यासह शेतकऱ्यांची हंगाम २०१८-१९ची १६ कोटी एफआरपी, कामगारांचा ४० महिन्यांचा पगार, भविष्यनिर्वाह निधी, व्यापारी, ऊस तोडणी वाहतूक यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व ‘मधुकर’ची चाके पुन्हा सुरू व्हावी यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय समोर आला आहे. मात्र त्यालाही कोरोनाची बाधा आडवी आली आहे. भाडेतत्त्वावर देण्यासाठी सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक असते. ती न मिळाल्याने विषय लांबणीवर पडला. पण त्यासाठीच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वसाधारण सभेसाठी कार्योत्तर परवानगीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठवला आहे. शासनाची ही आजारी कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नवी नियमावली जाहीर झाली आहे. त्याचाही उपयोग होणार आहे. त्यासाठी (फायनान्शियल मॉडेल) आर्थिक आवश्यक पत्रके सादर करावी लागणार आहे.‘मधुकर’मध्ये सद्य:स्थितीत ३० ते ३५ कोटी रुपयाची एक लाख १६ हजार साखर पोती पडून आहे, तर इतर कुठलीच शासकीय देणी नाही, असे चेअरमन शरद महाजन यांनी सांगितले.भाडेतत्त्वाच्या प्रक्रियेला वर्षभरापूर्वीच सुरुवात करणे गरजेचे होते -संचालक नितीन चौधरीमधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीच्या प्रक्रियेला वर्षभरापूर्वीच सुरवात केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. शेतकरी कामगार, संबंधित घटक यांना काही प्रमाणात का होईना मोबदला दिला गेला असता, असे स्पष्ट मत कारखान्याचे संचालक व सध्या भाडेतत्त्वावर कारखाना देण्यासाठी आग्रही प्रयत्न करणारे नितीन व्यंकट चौधरी यांनी व्यक्त केल.ेयावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न आवश्यक असतात. केवळ ई-मेलवर पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लागत नसतात. त्यासाठी संबंधितांना प्रत्यक्ष भेटून प्रयत्न करणे गरजेचे असते, अशीही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी उशिरा का होईना ‘मधुकर’ भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आह.े त्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनीही सहकार्याची भूमिका घेत पत्र देऊन कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी लागणारी सर्वसाधारण सभेची काही कार्योत्तर परवानगीची मागणी केली आहे. त्यावर सहकारमंत्री जयंतराव पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वसाधारण सभेच्या कार्योत्तर परवानगीसाठी नुकताच औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (आरजेडी) यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आल्याचेही संचालक नितीन चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFaizpurफैजपूर