जिजाबराव वाघ
चाळीसगाव : वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाणारे राजकारण भाषेच्या प्रांतातही आहेच. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर हे राजकारण जाणीवपूर्वक थांबवावे लागेल. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचादेखील मान राखला गेला पाहिजे. संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हिंदीशिवाय पर्याय नाही, असे मत हिंदी अभ्यासकांनी व्यक्त केले.
राष्ट्रभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला 'लोकमत'ने या अभ्यासकांची मते जाणून घेतली. हिंदीचा वापर वाढतोय, मात्र क्षेत्र मर्यादितच आहे.
चौकट 1...आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असणे जसे आवश्यक आहे, त्याप्रमाणे जीवनात यश मिळवायचे असेल तर राजभाषाही शिकलीच पाहिजे. कारण आपल्या देशाची भाषा आणि संस्कृती महत्त्वाची मानली जाते.
2... हिंदी भाषेचा प्रयोग खूप वाढला. मात्र क्षेत्र मर्यादित आहे, ते व्यापक व्हायला हवे. व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात आजही इंग्रजीचा मोठा वापर होतो
. 3...हिंदी भाषा व्यापारात व तंत्रज्ञानात यायला हवी. उच्चशिक्षणात केवळ साहित्यिकांचे अध्ययन पुरेसे नाही, त्याव्यतिरिक्त हिंदीला कामकाजाची भाषा, व्यावहारिक भाषेच्या रूपात शिकविणे गरजेचे आहे.
4. आता वैश्विक स्तरावर मान्यता मिळणे, ही राष्ट्रभाषेची निकड आहे.
5.. हिंदीच्या विद्यार्थ्यांनी सखोल अध्ययनाकडे वळणे ही गरज आहे.
अभ्यासकांच्या चर्चेतील सूर...
१) मराठीसह भोजपुरी, बिहारी, हिंदी आदी भाषांचा उगम संस्कृतमधून झाला आहे. साहजिकच उत्तर भारतीयांना हिंदी भाषा खूप जवळची वाटते. परस्परविरोधी ही दोन टोके आहेत. हिंदीचा विश्वस्तरावर प्रसार होण्यासाठी अगोदर देशस्तरावरील अडचणी दूर कराव्या लागतील.
- प्रा. डॉ. जिजाबराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र हिंदी भाषा परिषद, पाचोरा
२) आजही राष्ट्रभाषेची दयनीय अवस्था आहे. हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजात उपयोग करून घेतला जात नाही. बँकांमध्ये हिंदी भाषेचा वापर अनिवार्य असतानाही येथे इंग्रजीचा वारू उधळलेला दिसतो. भाषेच्या अभ्यासातही अगदी केजी ते पीजीपर्यंत विद्यार्थ्यांची गळती आहे. शासकीय पातळीवर सन्मानाऐवजी अवहेलना अधिक होते. कार्यालयांमध्ये हिंदीची सर्रास गळचेपी केली जाते. शिक्षणात व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लागल्याने भाषेचे महत्त्व कमी झाले आहे. - प्रा. डॉ. सुनीता कावळे, प्रमुख, हिंदी विभाग, चाळीसगाव महाविद्यालय
३) संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले. आजही हिंदीला तिचा मान मिळालेला नाही. राष्ट्रीय, सामाजिक व वैश्विक एकतेसाठी हिंदी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आहे. जगाला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची असेल तर हिंदीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला गेला पाहिजे. -प्रवीण रमेश ठाकूर, शिक्षक, पिलखोड, ता. चाळीसगाव
फोटो