मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 13:59 IST2021-08-03T13:58:31+5:302021-08-03T13:59:08+5:30
पूरग्रस्तांसाठी आयोजित मदतफेरीत ४८ हजार रुपये मदत जमा झाली.

मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतफेरी
मुक्ताईनगर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी शहरात मदतफेरी काढली. या मदतफेरीत सामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यापारी, फेरीवाले, फळ व भाजी विकेते, डॉक्टर मंडळींचा प्रतिसाद मिळाला आणि ४८हजार रुपये मदतनिधी संकलित करण्यात आले.
मदतफेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यु. डी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल महाराज खोले, सोशल मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष शिवराज पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य किशोर चौधरी, तालुका उपाध्यक्ष भाऊराव पाटील (धामणदेकर), युवराज पाटील, तालुका उपाध्यक्ष रणजित गोयंका, ओ.बी.सी. सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजेश ढोले, किसान सेल तालुकाध्यक्ष श्रीराम चौधरी, माजी सरपंच प्रवीण पाटील, तालुका सरचिटणीस आप्पा नाईक, तालुकाध्यक्ष मागासवर्गीय सेल अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, राजू बोदडे, नीतेश राठोड, नीलेश शिरसाठ, संजय कोळी, अजय महाराज तळेले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.