साकेगाव वि.का.संस्थेवर राष्ट्रवादीचे किशोर भोई चेअरमनपदी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 14:41 IST2020-08-31T14:39:19+5:302020-08-31T14:41:19+5:30
साकेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

साकेगाव वि.का.संस्थेवर राष्ट्रवादीचे किशोर भोई चेअरमनपदी बिनविरोध
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वि.का. संस्थेवर प्रत्येक समाजातील घटकाला न्याय मिळावा या उद्देशातून दरवर्षी एकाला संधी या फार्म्युल्यानुसार शब्द पाळून प्रथम वर्षी शालिनीबाई पवार, द्वितीय वर्षी बाबूलाल भोई यांना अनुक्रमे चेअरमनपदाची संधी देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे दोघांनी आपले शब्द पाळूून राजीनामे दिले.
यंदा किशोर भोई यांची नियमाप्रमाणे चेअरमनपदी निवड करण्यात आली. सहकारी संस्था निवडणूक अधिकारी एस.यु.तडवी यांच्या उपस्थित नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात एकमेव अर्ज किशोर भोई यांचा असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी निवृत्ती पवार, उपसरपंच शकील पटेल, नामदेव भोई, माजी चेअरमन बाबूलाल भोई, व्हाईस चेअरमन अर्जुन उपासे, सदस्य केशव पाटील, विजय पाटील, चंद्रकांत पवार, संतोष पाटील, शालिनीबाई पवार, इंदूबाई पवार, सचिव सुभाष पाटील, रमेश कचरे, राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील, गजानन पवार, शशिकांत पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.