गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे चूल पेटवा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:51 IST2020-12-27T17:49:09+5:302020-12-27T17:51:50+5:30
घरगुती स्वयंपाकाचा गॅस १०० रुपयांनी वाढवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रस्त्यावर चूल पेटवा आंदोलन करून भाकरी भाजल्या.

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे चूल पेटवा आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : केंद्र सरकारने घरगुती स्वयंपाकाचा गॅस १०० रुपयांनी वाढवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रस्त्यावर चूल पेटवा आंदोलन करून भाकरी भाजल्या.
जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष कविता पवार, अलका पवार, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, राजश्री पाटील, आशा शिंदे आदींनी रस्त्यावर काड्या काट्यानी चूल पेटवून केंद्र सरकरच्या विरोधात घोषणा दिल्या व चुलीवर भाकरी भाजल्या. यासह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस दिल्याबद्दलही सरकारचा निषेध केला.