भुसावळ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करकणाऱ्या आरोपींना अतिशय कठोर शिक्षा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाने केली आहे.या आशयाचे निवेदन शहराध्यक्षा नंदा निकम यांनी प्रशासनाला दिले आहे. हाथरस घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, योगी सरकारचा निषेध करण्यात आला.निवेदनावर रजीया बी, रचना यादव, अनिता गाजरे, ललिता अंभोरे, परविन पिंजारी, अमिना पिंजारी यांच्या सह्या आहेत.
भुसावळात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हाथरस घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:33 IST