भुसावळात पडळकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:33 IST2020-06-27T16:32:51+5:302020-06-27T16:33:42+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.

NCP protests Padalkar in Bhusawal | भुसावळात पडळकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

भुसावळात पडळकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

भुसावळ : राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत अपशब्द वापरणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करावी. तसेच त्यांच्या वैचारिक पातळीबद्दल निषेध करत शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी पुष्टी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आली. पडळकर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडास काळे फासण्यात येथील येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला याविषयी त्वरित दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन पुकारला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवित्रा घेण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, न.पा.गटनेते दुर्गेश ठाकूर, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवक शहराध्यक्ष रंजीत चावरिया, राहुल वाघ, भूपेंद्र तायडे, शाकीर पिंजारी, योगेश नरोटे, अमोल मांडे आदी उपस्थित होते.

Web Title: NCP protests Padalkar in Bhusawal