गॅस दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:12+5:302021-08-22T04:19:12+5:30

जळगाव : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महानगर महिला आघाडीतर्फे सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शास्त्री टॉवर चौक ...

NCP protests gas price hike | गॅस दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

गॅस दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

जळगाव : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महानगर महिला आघाडीतर्फे सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शास्त्री टॉवर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही रॅली होती. यानंतर शिवतीर्थ मैदानावर केंद्र सरकारविरोधात घोषणा देत दरवाढ मागे घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भूलथापा दिल्या, अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले, प्रत्यक्षात मात्र, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सामान्यांचे जगणे कठीण केले आहे, असा आरोप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा महानगर अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, राजेश पाटील, अशोक पाटील, विलास पाटील, अनिरुध्द जाधव, रिजवान खाटीक, मजहर पठाण, रहीम तडवी, अकील पटेल, सुशील शिंदे, विशाल देशमुख, मीनाक्षी चव्हाण, दीपिका भामरे, संगीता भामरे, सायायबिन पटेल, सुनीता सूर्यवंशी, आशा येवले आदी उपस्थित होते.

Web Title: NCP protests gas price hike