बसस्थानकासमोर प्रस्तावित शौचालयाला राष्ट्रवादीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:18+5:302021-08-23T04:19:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नवीन बस स्थानकासमोर अत्याधुनिक शौचालयाच्या बांधकामाला शहरातील नागरिकांसह अनेक संस्था व संघटनांचा विरोध ...

NCP opposes proposed toilet in front of bus stand | बसस्थानकासमोर प्रस्तावित शौचालयाला राष्ट्रवादीचा विरोध

बसस्थानकासमोर प्रस्तावित शौचालयाला राष्ट्रवादीचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नवीन बस स्थानकासमोर अत्याधुनिक शौचालयाच्या बांधकामाला शहरातील नागरिकांसह अनेक संस्था व संघटनांचा विरोध असून हे शौचालय पोलीस मल्टिपर्पज हॉलजवळ असावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या अर्बन सेलकडून करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. या शौचालयाची जागा न बदलल्यास जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

सुप्रीम कंपनीच्या सहकार्यातून अत्याधुनिक शौचालयाचे बांधकाम नियोजित आहे. नवीन बसस्थानकासमोरील जागेजवळ “चिमुकले राम मंदिर’’ आहे. तसेच या नियोजित शौचालयाचे आऊटलेट ज्या दिशेला असणार आहे, त्या जागेवर “शहीद सैनिक स्मारक ” आहे. यामुळे लोकांच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या मानवी भावना दुखावल्या जाणार आहेत. यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे हे शौचालय ‘पोलीस मल्टिपर्पज हॉलजवळ’ हलविणे योग्य राहील, असे निवेदनात म्हटले आहे. यासह नवीन बसस्थानकात आधीच असलेल्या शौचालयाची दुरुस्ती केल्यास ते प्रवाशांना अधिक फायदेशीर ठरणार आहे, असेही निवेदनात नमूद आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्षा डॉ. अश्विनी देशमुख, समन्वयक मुविकोराज कोल्हे, कार्याध्यक्ष मनोज वाणी, जयश्री बऱ्हाटे, तनुजा भिरुड, लीना पाटील, ममता पाटील, मानसी पाटील, वर्षा पाटील, मिलिंद सोनवणे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन, यशवंत पाटील, राकेश पाटील, अजय सोनवणे, कृष्णा पाटील, रईस खाटीक, दीपक सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: NCP opposes proposed toilet in front of bus stand