शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘निसर्ग’ चक्रीवादळाने बदलली तीनवेळा दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:02 PM

जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग वादळाने २४ तासात तीनवेळा दिशा बदलली. यातच सुदैवाने वेग मंदावल्याने हानी कमी ...

जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग वादळाने २४ तासात तीनवेळा दिशा बदलली. यातच सुदैवाने वेग मंदावल्याने हानी कमी झाली आहे. या वादळ आणि पावसामुळे रात्री अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.निसर्ग वादळाने गुजरात व महाराष्टÑाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती. मात्र, हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. त्यानुसार उत्तर महाराष्टÑात हे वादळ धुळे व शिरपूर मार्गे मध्यप्रदेशकडे मार्गक्रमण करेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. तसेच बुधवारी रात्री १ वाजेपर्यंत वादळ जाणार होते. मात्र, नाशिकला वादळ पोहचल्यानंतर अचानक वादळाने दिशा बदलली मालेगावकडे न वळता हे वादळ मनमाडमार्गे चाळीसगाव परिसरात घुसले, त्यानंतर पुन्हा वादळाने दिशा बदलली शेवटी पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगरमार्गे या वादळाने मध्यप्रदेशकडे मार्गक्रमण झाले.सुदैवाने वेग मंदावल्याने हानी कमीअरबी समुद्रातून हे वादळ कोकणात धडकल्यानंतर उत्तर महराष्टÑाकडे येत असताना वादळाचा वेग मंदावला होता. तसेच वादळाचा मुख्य परिघ देखील कमी झाला होता.जिल्ह्यात चक्रीवादळाने प्रवेश केला तेव्हा परिघातील वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास वेग होता तर भोवताली हा वेग ३० ते ३५ किमी प्रतितास इतका होता. त्यामुळे सुदैवाने जिल्ह्यात वादळामुळे फार काही हानी झाली नाही.दरम्यान अरबी समुद्रातून किनारपट्टीवर झेपावल्यानंतर ते कोकणात घोंगावू लागले. कोकणात वाºयाचा वेग हा ताशी १०० ते १२० किमी असा होता. मात्र हळूहळू हे वादळ मुंबईकडे सरकू लागले. नवीमुंबईतही वाºयाचा वेग ताशी १०० किमीपर्यंतच होता.मात्र मुख्य मुंबईत वाºयाचा वेग कमी झाला. हे वादळ नाशिक जिल्ह्यात येइपर्यंत वाºयाचा वेग मंदावला असला तरी तो तितकाही कमी नव्हता. त्यानंतर हे वादळ भुसावळमार्गे मध्यप्रदेशाकडे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक दक्ष झालं.मात्र जळगावात या वाºयाचा वेग हा ३० ते ३५ किमी प्रतितास एवढा कमी होता. त्यामुळे शेतांमध्येदेखील सध्या केवळ केळीचे पीक असल्याने केळी उत्पादक शेतकरी वगळता शेतकऱ्यांनाही फारसा फटका या वादळामुळे बसला नाही आणि त्यानंतर हे वादळ शमलं, त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.केळीचे नुकसानबुधवारी रात्री निसर्ग वादळामुळे २५ ते ३० किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.यासह जोरदार वाºयामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांबदेखील कोसळल्याने जळगाव ग्रामीणसह अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, रात्री निसर्ग वादळाने दिशा बदलल्यामुळे धुळे जिल्ह्यातून हे वादळ न जाता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर मार्गे गेले. मात्र, त्याचा वेग काही प्रमाणात मंदावला होता. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव