शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राष्टÑवादीने आक्रमक होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 6:21 PM

विश्लेषण

सुशील देवकर

जळगाव-लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नैराश्य व मरगळ आलेल्या राष्टÑवादी काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यात आजही राष्टÑवादीत सुस्ती असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती मात्र २४ जुलै रोजी होत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर काम न करताच मत मागण्यास गेल्यास निवडणुका राष्टÑवादीसाठी केवळ एक उत्सव ठरण्याची भिती व्यक्त होत आहे.मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले. मात्र तरीही पक्षातील गटबाजी संपलेली नाही. पक्षाच्या जिवावर मोठे झालेल्या नेते, कार्यकर्त्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी पक्ष टिकवून ठेवण्याची धडपड करावी, असे वाटताना दिसत नाही. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत बसला. डॉ.सतीश पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अ‍ॅड.रविंद्र पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. मितभाषी असलेल्या अ‍ॅड.पाटील यांच्याकडून सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यासोबतच आक्रमकपणाची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी पक्षाकडे पदाचा राजीनामा पाठविला होता. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. निवडणुकांना जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने पक्षाला बदल करायचाच असेल तर तो तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र युवक, ज्येष्ठ अशा सगळ्यांनाच सोबत घेण्याची व जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची गरज आहे. मात्र शहरातील जनतेच्या समस्यांवर देखील एकही पदाधिकारी आवाज उठविताना दिसत नसल्याचे चित्र आहे. ते बदलण्याची गरज आहे.जनतेचे प्रश्न आक्रमकपणे आंदोलन करून मांडले, सोडविले तरच मतदार पक्षाकडे वळेल. युवा मतदारही पक्षासोबत येईल. मात्र अपवाद वगळता राष्टÑवादीकडून जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन झाल्याचे दिसून आलेले नाही. याउलट शहरात नावालाच अस्तित्व उरलेल्या काँग्रेसकडून खराब रस्ते, खड्डे व जनतेच्या प्रश्नांवर मनपासमोर धरणे, आंदोलन केले जात आहे. राष्टÑवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविल्याचे दिसून आले. असे असताना राष्टÑवादी मात्र आंदोलन करण्यास किंवा जनतेचे प्रश्न मांडण्यास का कचरतेय? असा प्रश्न आता राष्टÑवादीच्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडायला लागलाय. अगदी सोशल मिडियावर देखील व आपसातही हे कार्यकर्ते याबाबत चर्चा करून खंत व्यक्त करताना दिसतात. पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्टÑवादीच्या नेतृत्वाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.