राष्ट्रवादी काँग्रेसचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:48+5:302021-06-24T04:13:48+5:30

बैठक : माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिले संकेत पारोळा : आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, ...

Of the Nationalist Congress | राष्ट्रवादी काँग्रेसचा

राष्ट्रवादी काँग्रेसचा

बैठक : माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिले संकेत

पारोळा : आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या सर्व निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर स्वबळावर लढविल्या जातील, असा संकेत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिला.

पारोळा येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक जोडो संपर्क अभियान व आढावा बैठकीत हे संकेत दिले. मार्गदर्शक म्हणून युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉ. शांताराम पाटील, बाळू पाटील, युवक अध्यक्ष योगेश रोकडे, अंकुश भागवत, गणेश पाटील, आदी जण उपस्थित होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. सतीश पाटील म्हणाले की, संघटनेत प्रामाणिकपणे काम करा, संघटन करून मोठे व्हा म्हणजे पदे आपोआप मिळतील.

यांच्या झाल्यात नियुक्त्या

दीपक पुंडलिक पाटील (कार्याध्यक्ष), दादाभाऊ महादू पाटील (तालुका कार्याध्यक्ष), सनी कैलास निकम (तालुका उपाध्यक्ष), अक्षय दशरथ वाघ (उपाध्यक्ष), मुकेश विश्वास पाटील (उपाध्यक्ष), समाधान संतोष पाटील (उपाध्यक्ष), नितीन सुभाष पाटील (मंगरूळ शिरसमनी, जि.प. गटप्रमुख), सुनील मोहन माळी (गणप्रमुख- शिरसमणी), अक्षय निकम (देवगाव गणप्रमुख), भावेश पाटील, राजेंद्र पाटील, गोपाल माळी आदींची निवड करण्यात आली. आभार लोकेश पवार यांनी मानले.

Web Title: Of the Nationalist Congress