समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:43+5:302021-08-18T04:21:43+5:30
पातोंडा, ता. अमळनेर : समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने ‘भारतातील युवा विकासासाठी ...

समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
पातोंडा, ता. अमळनेर : समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने ‘भारतातील युवा विकासासाठी व्यावसायिक समाजकार्याचे महत्त्व’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्राच्या प्रथम सत्रामध्ये राजीव गांधी युवा विकास संस्थानचे प्रा. डाॅ. रामबाबू बोत्चा यांनी ‘उद्योजकता विकासातून रोजगार निर्मितीमध्ये तरुणांचा सहभाग आणि समाज कार्यकर्त्याची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले तर द्वितीय सत्रामध्ये प्रा. डॉ. एस. कुमारवेल यांनी ‘उदयोन्मुख परिस्थितीच्या संदर्भात युवकांसोबत समाजकार्य’ या विषयावर आपले विचार मांडले. चर्चासत्राच्या शेवटच्या सत्रात दिल्ली विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील प्रा. सुधीर मस्के यांनी ‘युवा विकासासाठी व्यावसायिक सामाजिक कार्य’ या विषयावर सहभागीतांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाचे उद्घाटनपर संबोधन अभिजित भांडारकर यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. भरत खंडागळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांनी केले. चर्चासत्रामध्ये देशभरातील दहा राज्यांतून ३४७ अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यशस्वितेसाठी श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासाहेब सुभाष भांडारकर, चर्चासत्राचे कनव्हेनर तथा श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक अभिजित भंडारकर, रोटरी क्लब अंमळनेर अध्यक्ष वृषभ पारख, समाजकार्य महाविद्यालय अमळनेरचे प्राचार्य डॉ. पी.एस. पाटील आदींनी मार्गदर्शन केले.