राष्ट्रीयस्तरावरील सादरीकरण स्पर्धा प्रतापची ‛दर्शिता' जाधव देशात तिसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:30+5:302021-08-17T04:23:30+5:30

तृतीय क्रमांकाचे व्यक्तिगत स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक प्राप्त केले आहे. सोशल मीडिया ‘बुन ओर बेन’ या विषयावर ...

National level presentation competition Pratap's 'Darshita' Jadhav is third in the country | राष्ट्रीयस्तरावरील सादरीकरण स्पर्धा प्रतापची ‛दर्शिता' जाधव देशात तिसरी

राष्ट्रीयस्तरावरील सादरीकरण स्पर्धा प्रतापची ‛दर्शिता' जाधव देशात तिसरी

तृतीय क्रमांकाचे व्यक्तिगत स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक प्राप्त केले आहे. सोशल मीडिया ‘बुन ओर बेन’ या विषयावर अतिशय उत्कृष्ट सादरीकरण या विद्यार्थिनीने केले होते. स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातील नामांकित १२० पेक्षा जास्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अशा आव्हानात्मक स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दर्शिताने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन यांच्या हस्ते दर्शिताचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, चिटणीस मा. प्रा. डॉ. ए. बी. जैन, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र माळी, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. योगेश तोरवणे, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. किरण भागवत, प्रा. अनिल झळके, प्रा. बालाजी कांबळे, प्रा. ज्ञानेश्वर मराठे आदी उपस्थित होते.

Web Title: National level presentation competition Pratap's 'Darshita' Jadhav is third in the country