८ डिसेंबरला राष्ट्रीय स्तरावरील ‘मेस्ट्रो’ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:20+5:302020-12-04T04:44:20+5:30

जळगाव - केसीई सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन व प्रशाळेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ...

National level Maestro competition on December 8 | ८ डिसेंबरला राष्ट्रीय स्तरावरील ‘मेस्ट्रो’ स्पर्धा

८ डिसेंबरला राष्ट्रीय स्तरावरील ‘मेस्ट्रो’ स्पर्धा

जळगाव - केसीई सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन व प्रशाळेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी मेस्ट्रो राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ८ डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची माहिती ऑर्गनाईझिंग सेक्रेटरी डॉ. संगीता पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मू.जे. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत ए.पी.सरोदे, वाय.ए.सैंदाणे, डॉ. पी.एम.जोशी, ए.एन.आर्सीवाला, संदीप केदार आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे शासकीय नियमांचे पालन करून आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जपणे महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलविले जाणार नाही. स्पर्धकांना आपल्या घरून या स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे यासाठी हि स्पर्धा या वर्षी नाविन्यपूर्ण रितीने ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असल्याचेही संगीता पाटील यांनी सांगितले. तर पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन, अड्वर्टाइसमेंट डेव्हलोपमेंट, क्वीज कॉम्पिटिशन,

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आदी चार स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या mjcollege.kces.in/ या संकेतस्थळावर दिलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद , बुलढाणा, अकोला, मुंबई या सारख्या ठिकाणाहून तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात विचारणा होऊन प्रतिसाद मिळत आहे .

Web Title: National level Maestro competition on December 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.