राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:57+5:302021-07-02T04:11:57+5:30
वरखेडी (ता. पाचोरा) : प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडीअंतर्गत वरखेडी बु., वरखेडी खुर्द आणि भोकरी येथे राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग ...

राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण अभियान
वरखेडी (ता. पाचोरा) : प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडीअंतर्गत वरखेडी बु., वरखेडी खुर्द आणि भोकरी येथे राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण अभियानाला एक जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. यात दररोज दोन कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्वेक्षण केले जाते.
अंगावर चट्टे, डाग तसेच कुटुंबात कुणाला तीन आठवड्यांपासून सर्दी, ताप, खोकला आहे काय, याची तपासणी केली जाते. हे अभियान तीन महिने चालणार आहे. यासाठी वरखेडी येथे आरोग्यसेवक राजेंद्र भिवसने, आरोग्यसेविका व्ही. जी. देवराय, गटप्रवर्तक शोभा पाटील, आशा स्वयंसेविका छाया देवरे, मीना माथूर वैश्य, संगीता पाटील यांनी गुरुवारपासून या राष्ट्रीय सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. या सर्वेक्षण अभियानात वरखेडी बु. येथील ४३० कुटुंबांचे, वरखेडी खुर्द येथील १८० कुटुंबांचे, तर भोकरी गावी ९६६ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.