रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:00 PM2019-09-20T16:00:40+5:302019-09-20T16:01:11+5:30

रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ प्रदान करण्यात आला.

Nation Builder Award for 3 teachers by Rotary Club | रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड

googlenewsNext

चोपडा, जि.जळगाव : राष्ट्र घडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रतीचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासह चांगले काम करणाºया शिक्षकांना प्रोत्साहीत करण्याच्या भावनेतून येथील रोटरी क्लबतर्फे ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवार्ड’ प्रदान करण्यात आला. नगरवाचन मंदिरात दि.१९ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
येथील तहसीलदार अनिल गावीत यांच्या हस्ते व सहप्रांतपाल अभियंता विलास एस.पाटील तसेच चोपडा रोटरी क्लब अध्यक्ष नितीन जैन व मानद सचिव धीरज अग्रवाल, सोहळा प्रकल्प प्रमुख संजीव गुजराथी, नितीन अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारार्थी शिक्षक असे- प्रा.डॉ.ए.एल. चौधरी (कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय), मयूरेश सोनवणे (बालमोहन विद्यालय), विजया पाटील (कस्तुरबा विद्यालय), रतन माने (पंकज माध्यमिक विद्यालय), रत्ना पाटील (क्लारा इंग्लिश् मीडियम स्कूल), हेमराज पाटील (विवेकानंद माध्यमिक विद्यालय), दीपाली धनगर (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय), एन.वाय.मलिक (प्रताप विद्यामंदिर), कलाशिक्षक नरेंद्र पाटील (जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी), शरद जगताप (कै.शा.शि.पाटील विद्यालय, चहार्डी) भालचंद्र पवार (सत्रासेन माध्यमिक आश्रमशाळा) या शिक्षकांना शाल, मणिमाळ व गौरवपत्र फ्रेम देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी तहसीलदार अनिल गावीत यांनी मी पण जि.प., नवोदय तसेच आदिवासी आश्रमशाळेतून शिक्षण घेत घडलोय. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांचीही नेशन बिल्डर अवार्ड देऊन गौरव होताना पाहून आनंद होतोय, असं म्हणत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सत्कारार्र्थींमधून हेमराज पाटील, दीपाली धनगर व एन. वाय. मलिक यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अध्यक्ष नितीन जैन यांनी, आभार सचिव धीरज अग्रवाल, तर सूत्रसंचालन राधेश्याम पाटील केले.
याप्रसंगी प्रा.विलास पी पाटील, एम.डब्ल्यू. पाटील, आशीष गुजराथी प्रफुल्ल गुजराथी, डॉ.वारके, अशोक जैन, धीरेंद्र जैन, विलास कोष्टी, महेंद्र बोरसे, पवन गुजराथी, शिरीष पालीवाल, जितेंद्र बोथरा, निखिल सोनवणे व अनेक रोटरी सदस्य व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Nation Builder Award for 3 teachers by Rotary Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.