राष्टÑवादीकडून स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:59 IST2019-11-07T20:54:59+5:302019-11-07T20:59:28+5:30
जळगाव - अनेक महिन्यांपासून शहरातील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपा प्रशासनाकडून कोणतीही दुरुस्ती होत नाहीय, त्यातच राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी ...

राष्टÑवादीकडून स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती
जळगाव - अनेक महिन्यांपासून शहरातील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपा प्रशासनाकडून कोणतीही दुरुस्ती होत नाहीय, त्यातच राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी अभिषेक पाटील यांनी बुधवारी स्वखर्चाने गणेश कॉलनीपासून खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतल्यामुळे या मोहीमेचा धसका घेत मनपानेही याच रस्त्यावरून खड्डे दुरुस्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकीकडे राष्टÑवादी तर दुसरीकडे मनपाकडून रस्ता दुरुस्तीसाठी जुगलबंदी पहायला मिळाली.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांची खड्डे बुजविण्याबाबतची उदासीनता लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘माझा वार्ड, माझी समस्या’ या उपक्रमातंर्गत स्वखर्चाने खड्डे बुजण्यास सुरुवात केली. यावेळी रा.यु.काँ. महानराध्यक्ष अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, राजेश पाटील, राजेश मोरे, सलिम इनामदार, भरत कार्डिले, किशोर पाटील, प्रशांत राजपूत, राजदीप पाटील, किरण राजपूत, तुषार इंगळे, ममता सोनवणे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या ह्या उपक्रमाने खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनानेही खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असली तरी निकृष्ट पध्दतीने खड्डे बुजविण्यात येत असल्याचेच पहायला मिळाले.
राष्टÑवादी कॉँग्रेसने सकाळी ९ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी चौकापासून खड्डे दुरुस्तीस सुरुवात केली. काही खड्डे दुरुस्त करण्यात आल्यानंतर काही वेळातच मनपाचे खडीने भरलेले ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झाले. तसेच मनपाकडून देखील रस्ते दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली. राष्टÑवादीकडून पेव्हर ब्लॉक व कॉँक्रीटने रस्ते दुरुस्त होत असताना दुसरीकडे मनपाकडून डांबरने रस्ते दुरुस्त केले जात असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळाली. गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक पर्यंतच्या रस्त्यालगतचे खड्डे राष्टÑवादीकडून दुरुस्त करण्यात आले. तसेच रिंगरोडवरील देखील काही खड्डे दुरुस्त करण्यात आले.