‘शिक्षक भारती’च्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी नाना पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:55 IST2020-08-31T15:54:49+5:302020-08-31T15:55:06+5:30

शिक्षक भारती विनाअनुदानित धोरण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी टिटवी येथील नाना सुकदेव पाटील यांची निवड करण्यात आली.

Nana Patil as Nashik Divisional President of 'Shikshak Bharati' | ‘शिक्षक भारती’च्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी नाना पाटील

‘शिक्षक भारती’च्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी नाना पाटील

पारोळा : शिक्षक भारती विनाअनुदानित धोरण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी टिटवी येथील नाना सुकदेव पाटील यांची निवड करण्यात आली. या समितीचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
गेल्या २० वर्षापासून विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागावर एक सक्षम नेतृत्व नाना पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. या संघर्ष समितीच्या नासिक विभागीय अध्यक्ष पदावर आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करून विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, असा आशावाद नाना पाटील यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष जयवंत भाबड, कार्याध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस अशपाक खाटीक आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Nana Patil as Nashik Divisional President of 'Shikshak Bharati'