उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:05+5:302021-09-22T04:20:05+5:30

वाघुर धरणाच्या विसर्गात वाढ जळगाव-वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपासून वाघूर धरणातून पूर्वीचा ३४० क्युसेक ...

Name the flyover after Saint Namdev Maharaj | उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव द्या

उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव द्या

वाघुर धरणाच्या विसर्गात वाढ

जळगाव-वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपासून वाघूर धरणातून पूर्वीचा ३४० क्युसेक व वाढीव ३४० क्युसेक्स असा एकूण ६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

सातवा वेतन आयोग लागू करा

जळगाव - मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. मात्र, अजूनही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ होत नसून, लवकरात लवकर मनपा कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत मनपा कर्मचाऱ्यांकडून महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना स्मरणपत्र देण्यात आले आहेत. यासह महामार्ग फरकाची रक्कम अदा करण्याची मागणीही या स्मरणपत्राद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Name the flyover after Saint Namdev Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.