महिला महाविद्यालयात नॅक देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST2021-02-20T04:45:29+5:302021-02-20T04:45:29+5:30

जळगाव : येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य, व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात २१ आणि २३ फेब्रुवारी ...

NAC to visit women's college | महिला महाविद्यालयात नॅक देणार भेट

महिला महाविद्यालयात नॅक देणार भेट

जळगाव : येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य, व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात २१ आणि २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) भेट देणार आहे. ही नॅक समिती महाविद्यालयाची गुणवत्ता, अध्यापनाचा दर्जा, शैक्षणिक व पायाभूत सुविधा यासह इतर बाबींचे मूल्यांकन करणार आहे. या आधीच्या दोन्ही मूल्यांकनांमध्ये बी ग्रेड प्रदान करण्यात आली होती.

संस्थेचे अध्यक्ष ए.पी. चौधरी, सचिव प्रा. बी.एम. महाजन, यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे, उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव यांच्या नेतृत्वात महाविद्यालय नॅक मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. या समितीत चेअरमन म्हणून डॉ. क्षमा अग्रवाल, समन्वयक म्हणून प्रा. डॉ. अशोक हंजागी, आणि प्रा. डॉ. संजुक्ता दास यांचा समावेश आहे.

Web Title: NAC to visit women's college