महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात उद्या नॅक समिती येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:07+5:302021-09-14T04:20:07+5:30
जुलै २०१७ पासून मूल्यांकन पद्धतीत बदल झाला असून गुणात्मक व संख्यात्मक ९६ प्रश्नांच्या आधारे महाविद्यालयाने ‘स्व’ मूल्यमापन अहवाल ...

महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात उद्या नॅक समिती येणार
जुलै २०१७ पासून मूल्यांकन पद्धतीत बदल झाला असून गुणात्मक व संख्यात्मक ९६ प्रश्नांच्या आधारे महाविद्यालयाने ‘स्व’ मूल्यमापन अहवाल मूल्यांकन संस्था पोर्टलवर ऑनलाईन पुराव्यानिशी सादर केल्यानंतर पिअर टीम प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करीत असते. महाविद्यालयाने दि. १२ जानेवारी २०२१ रोजी आयआयक्यूए सादर करून एस. एस. आर. भरायला सुरुवात केली होती. त्यानुसार पिअर टीम समोर सादरीकरण होणार आहे.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय मूल्यांकन व नामांकन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करून घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशा विजय पाटील, सचिव-डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, प्र. रजिस्टार डी. एम. पाटील हे अंतर्गत गुणवत्ता हमी समिती सदस्य सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. संदीप पाटील यांनी कळविले आहे.