‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST2021-01-08T04:48:06+5:302021-01-08T04:48:06+5:30
जळगाव : घरी १७ म्हशी, १४ गायी, रोज १२८ घरांमध्ये दूध वाटपाचे काम. त्यात कुटुंबातील कर्त्या वडिलांचा हात मोडल्याने ...

‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..
जळगाव : घरी १७ म्हशी, १४ गायी, रोज १२८ घरांमध्ये दूध वाटपाचे काम. त्यात कुटुंबातील कर्त्या वडिलांचा हात मोडल्याने व्यवसाय ठप्प होऊ पाहणाऱ्या स्थितीत शिवधाम मंदिर परिसरातील आंचल संतोष पवार या तरुणीने ‘ म्हारी छोरियां छोरों से कम हैं के...’चा प्रत्यय देत तब्बल दीड महिना दूध वाटपाचे काम केले. या हिम्मतीचा लायनेस क्लबकडून नुकताच सत्कार करण्यात आला.
मुलगा वंशाचा दिवा या हट्टापायी अनेक पालक मुलींना दुय्यम वागणूक देत असतात. मात्र महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देत नावलौकिक मिळविण्यास सुरुवात केली आहे.
वडिलांचा हात फ्रॅक्चर होऊन पडले ३६ टाके
निमखेडी परिसरातील शिवधाम मंदिर परिसरात संतोष पवार यांचा रहिवास आहे. दूध विक्रीचा व्यवसाय असलेल्या पवार यांच्या हातावर जून महिन्यात हॅण्ड ग्राइण्डर मशीन पडल्याने हात फ्रॅक्चर झाला होता. पवार यांच्या हाताला ३६ टाके पडले होते. त्याच्याकडे १७ म्हशी व ०४ गायी आहेत. अपघातामुळे दूध वाटपाचे काम कसे शक्य होईल का या विवंचनेत असताना मोठी मुलगी आंचल हिने वडिलांना हिम्मत देत दूध वितरणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
रोज १२८ घरी दूध वाटप
आंचल नूतन मराठा काॅलेजमध्ये मायक्रो बायोलाॅजीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. कोरोनाकाळातील लाॅकडाऊनमुळे तिने वडिलांच्या अपघातानंतर दूध वाटपाची जबाबदारी सांभाळली. सकाळी दूध काढल्यानंतर १२८ घरांमध्ये दुचाकीच्या साहाय्याने आंचलने घरोघरी दूध पोचविण्याचे काम सुरू केले. एक -दोन दिवस नव्हे तर दीड महिना हे काम तिने केले.
''''म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..
संतोष पवार यांना दोन्ही मुलीच आहेत. मोठी मुलगी आंचल व दुसरी मुलगी वैष्णवी ११ वीला आहे. वडील अपघातात जखमी झाल्यानंतर अवघड जबाबदारी सांभाळणाऱ्या आंचल व वैष्णवी यांच्याबद्दल पवार यांची भावना ''''म्हारी छोरियां छोरों से कम हैं के..’ अशीच आहे.
लायनेस क्लब ऑफ जळगावने केला सन्मान
कठीण प्रसंगात आंचल हिचे धैर्य पाहून लायनेस क्लब ऑफ जळगावच्या प्रेसिडेंट प्रीती कर्नावट, सचिव अलका कांकरिया, महेश्वरी पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी तिचा सन्मान केला.