चाळीसगाव घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी येथे मुस्लीम खाटीक समाजाचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:26 IST2018-09-30T12:25:57+5:302018-09-30T12:26:07+5:30

निषेध मोर्चात सर्वसमाज बांधवांचा समावेश

Muslim community protested | चाळीसगाव घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी येथे मुस्लीम खाटीक समाजाचा मूकमोर्चा

चाळीसगाव घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी येथे मुस्लीम खाटीक समाजाचा मूकमोर्चा

शेंदुर्णी, जि. जळगाव - चाळीसगाव येथे २३ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अकील खाटीक उर्फ बबलू खाटीक यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजातर्फे मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व खाटीक समाजाचे तालुकाध्यक्ष अकिल कादर खाटीक, उपाध्यक्ष फारूक सुलेमान खाटीक, मन्सूर पिंजारी, हाजी नबी शहा, अविनाश निकम, रवींद्र गुजर मोसिन खाटीक, अफसर खाटीक, जाकिर खाटीक निसार पैलवान यांच्यासह सर्व समाजातील बांधवांनी या मूकमोर्चात सहभाग नोंदविला.  जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी मूकमोर्चा येथील सर्व खाटीक बांधवांनी केली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Muslim community protested