जळगावात जखमी तरुणाच्या मदतीसाठी संगीत मैफल, शहरवासीय मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:12 IST2017-10-29T21:11:06+5:302017-10-29T21:12:06+5:30
स्तुत्य उपक्रम : आर्केस्टा फ्रेण्डस् सर्कलतर्फे आयोजन

जळगावात जखमी तरुणाच्या मदतीसाठी संगीत मैफल, शहरवासीय मंत्रमुग्ध
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - ‘तेरे जैसा यार कहा’, ‘यारी है इमान मेरी’, ‘रोते रोते हसना सिखो’, ‘प्रीतीचे झुळझूळ पाणी’ अशा एकाहून एक सरस मराठी, हिंदी गीतांची मेजवाणी असलेल्या गीत मैफलीच्या बहारदार कार्यक्रमाने रविवारी संध्याकाळी जळगावकरांचे मने जिंकले.
शिवजीनगरातील ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासाठी अपघातनिधी म्हणून आर्केस्टा फ्रेण्डस् सर्कलच्यावतीने बालगंधर्व सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुरेश भोळे, मेलडी सुपर हिटस् आर्केस्टाचे अध्यक्ष मोहन तायडे, सतीश देशमुख यांच्यासह शहरवासीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र हटकर, अजय बडगुजर, संगीता सामुद्रे, मनोज भालेराव, विजय चौधरी, नितीन सूर्यवंशी, सतीश बाटुंगे, डॉ. शांताराम सोनवणे यांनी गीत सादर केली. यासाठी प्रोजेक्टर ऑपरेटर ओम हटकर यांनी सहकार्य केले.
बहारदार गीतांनी रंगत
‘सनम तेरी कसम’, ‘एक प्यार का नगमा है’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’, ‘तेरे जैसा यार कहा’, ‘यारी है इमान मेरी’, ‘रोते रोते हसना सिखो’, ‘प्रीतीचे झुळझूळ पाणी’असे सदाबहार गीत सादर करण्यात आले. एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.
अपघातग्रस्तास करणार मदत
शिवाजीनगरमधील ज्ञानेश्वर कांबळे यांचा अहमदाबाद येथे अपघात झाल्याने त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यांना मदत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा अपघातग्रस्त निधी कांबळे यांना देण्यात येणार आहे.