कंडारीत दगडाने ठेचून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 13:22 IST2020-05-28T13:21:10+5:302020-05-28T13:22:09+5:30
रायपूरच्या उपसरपंचाची चौकशी

कंडारीत दगडाने ठेचून तरुणाचा खून
जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे तुषार प्रभाकर सुर्वे (४१) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गावाच्या बाहेर खळ्यात तुषारचा मृतदेह आढळून आला.
बुधवारी रात्री रायपुर येथील उपसरपंच वसंत सिताराम धनगर व तुषार दोघांनी खळ्यात मद्यप्राशन केले. त्यानंतर सकाळी तुषारचा मृतदेहच आढळून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहाचले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी गेला होता तर वसंत धनगर यांचे वाघूर धरणाजवळ घर आहे. रात्री साडे आठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी तपासात सांगितले आहे. नेरी-गाडेगाव रस्त्यावर तुषार यांचे शेत व खळे आहे. तुषार हा खळ्यात पलंगावर मयतावस्थेत पडलेल्या असल्याची माहिती प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांनी कुटुंबाला कळविली. पत्नी मनिषा यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार याच्या पश्चात वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, पत्नी मनिषा, मुलगा ओम, भाऊ हेमंत असा परिवार आहे.