खुनाची शिक्षा भोगून आलेल्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 12:42 IST2017-05-06T12:42:43+5:302017-05-06T12:42:43+5:30

धनसिंग उत्तम जाट (52) यांचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

Murder victim | खुनाची शिक्षा भोगून आलेल्याचा खून

खुनाची शिक्षा भोगून आलेल्याचा खून

ऑनलाइन लोकमत

बोदवड, जि. जळगाव, दि. 6 -  बोदवड तालुक्यातील राजूर येथे शेतीच्या वादातून धनसिंग उत्तम जाट (52) यांचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बोदवड पोलीस घटनास्थळी पोहचले असून खुनातील संशयिताविषयी कुणीही काहीही बोलण्यास तयार नाही. 
गेल्या आठ दिवसांपूर्वीच ते खुनाची शिक्षा भोगल्यानंतर बाहेर आल्याचे सांगण्यात आले. जाट यांच्यावर पत्नीचा खून केल्याचा आरोप होता व न्यायालयाने त्यांना दहा वर्ष शिक्षाही सुनावली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े

Web Title: Murder victim