जळगाव जिल्हा कारागृहात खून, कैद्यानेच भोसकले दुसऱ्या कैद्याला

By विजय.सैतवाल | Published: July 10, 2024 12:40 PM2024-07-10T12:40:01+5:302024-07-10T12:40:21+5:30

मारेकरी व मयत एकाच खून प्रकरणातील संशयित.

Murder in Jalgaon District Jail prisoner stabbed another prisoner | जळगाव जिल्हा कारागृहात खून, कैद्यानेच भोसकले दुसऱ्या कैद्याला

जळगाव जिल्हा कारागृहात खून, कैद्यानेच भोसकले दुसऱ्या कैद्याला

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या खून प्रकरणी जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या संशयीतामधील अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली.

भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (५५) यांचा ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळ येथे  खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित जळगाव कारागृहात आहेत.

यातील एक संशयित मोहसीन असगर खान (३४) याचा बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुसऱ्या संशयिताने धारदार शास्त्राने वार केले.  त्यानंतर मोहसिन यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. घटनास्थळी जिल्हा पेठ पोलिसांनी भेट दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: Murder in Jalgaon District Jail prisoner stabbed another prisoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव