जामनेर : जननायक फाउंडेशनचे अशपाक पटेल यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची भेट घेतली. शहरातील कामे व ई-गव्हर्नंस अंतर्गत होत असलेल्या कामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
शासनाच्या आदेशाप्रमाणे आतापर्यंत ऑनलाईन प्रणाली सुरू झालेली नाही. पालिकेचे संकेतस्थळ पूर्णपणे बंद आहे.
ऑनलान जन्म-मृत्यू नोंदणी व सुधारणा ही प्रणाली कार्यान्वित व्हायला हवी होती. पालिकेत ज्या प्रकारे जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी प्रकरण हाताळले जातात. त्याबाबत जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे.
एकूण लोकसंख्येपैकी तब्बल तीस टक्के जनसंख्या मुस्लिम असून त्यांच्या नावांत खूप चुका दिसून येतात. नगर परिषदेने प्रामुख्याने एक तर ऑनलाईन प्रणाली सुरू करावी, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी पटेल यांनी केली.
रस्ते, बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य समस्यांबाबत प्रशासनाने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी वसीम शेख हमीद, जमील खान व शफी पहेलवान उपस्थित होते.