मनपाची वसुली मोहीम थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:00 IST2020-02-03T22:00:27+5:302020-02-03T22:00:40+5:30
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे २०१२ पासून असलेल्या थकीत भाड्यापोटी डिसेंबर महिन्यात केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा मनपाने ...

मनपाची वसुली मोहीम थांबली
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे २०१२ पासून असलेल्या थकीत भाड्यापोटी डिसेंबर महिन्यात केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा मनपाने कारवाई थांबवली. मनपाच्या कारवाईनंतर २७०० पैकी केवळ २७० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली. अजूनही २५०० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे मध्येच कारवाई थांबविण्याचे कारण काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही निकाली लागलेला नाही. शासन व न्यायालयाकडूनही याबाबत ठोस भूमिका घेतल्यानंतरही मनपा प्रशासनाची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. तीन महिन्यांपुर्वी थकीत भाडे वसुल करण्यासाठी काही गाळे सील करून मनपाने मोहीम राबविली खरी मात्र त्यातही केवळ २७० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली. त्यानंतर सील केलेले गाळे देखील मनपाकडून उघडण्यात आले. मनपाने तब्बल सात वर्षानंतर गाळेधारकांकडून ५६ कोटी रुपयांची वसुली केली. मात्र, दीड महिन्यांपासून कारवाईला पुन्हा ब्रेक लागला आहे.
डॉ.उदय टेकाळे हे आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा पदभार आता नवीन आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे प्रभारी म्हणून पाहणार आहेत. सोमवारी डॉ.ढाकणे हे पदभार स्विकारणार आहेत. दरम्यान, प्रभारी म्हणून डॉ.ढाकणे यांना किती दिवस पदभार स्विकारावा लागेल यात साशंकता आहे. नवीन आयुक्तांची नियुक्ती प्रक्रिया लांबली तर डॉ.ढाकणे हे संवेदनशिल गाळे प्रकरणात हात घालतील का ? असा प्रश्न उपस्थित होतो.