मनपात आरोग्य शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:31+5:302021-09-17T04:21:31+5:30

जळगाव : गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतील मानाचा गणपती समोर महापालिकेकडून मनपा कर्मचाऱ्यांचा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी दुपारी ४ ते ...

Municipal health camp | मनपात आरोग्य शिबीर

मनपात आरोग्य शिबीर

जळगाव : गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतील मानाचा गणपती समोर महापालिकेकडून मनपा कर्मचाऱ्यांचा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ.महेंद्र काबरा, डॉ.यशवर्धन काबरा यांच्या जुने व आव्हानात्मक आजारांच्या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.

२० पर्यंत पावसाचा अंदाज

जळगाव : जिल्ह्यात आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. १७ ते २० दरम्यान विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. यासह अमळनेर, चोपडा, धरणगाव व पारोळा विभागात खंडित स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा खंड पाहण्याची शक्यता आहे.

दुध संघाची ३० रोजी सभा

जळगाव - जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पध्दतीने अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत एकूण १२ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. दुध संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असून, लवकरच दूध संघाची निवडणूक लागू शकते. त्यामुळे या संचालक मंडळाची ही शेवटची सर्वसाधारण सभा ठरणार आहे.

Web Title: Municipal health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.