स्फोट घडवून खून केल्याची मामाची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 17:07 IST2019-06-09T17:06:08+5:302019-06-09T17:07:19+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथीलजिलेटिन स्फोट प्रकरण

स्फोट घडवून खून केल्याची मामाची कबुली
मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाणा येथे दिनांक सहा जूनच्या मध्यरात्री आकाश राजू वरखेडे या २२ वर्षीय युवकाची जिलेटीनची कांडीने स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती या हत्याप्रकरणी मयताचा मामा जनार्दन विठोकार यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते, मात्र त्याने रात्री उशिरा आपणच जिलेटिनच्या कांडीचा स्फोट घडवून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी दिली.
६ जूनच्या मध्यरात्री तालुक्यातील चारठाणा येथे आकाश राजू वरखेडे हा युवक अंगणात झोपलेला असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास आकाशचा मामा जनार्दन विठोकार याने विहिरीमध्ये सुरुंग लावण्याचे जिलेटीन लावून स्फोट घडवून आणला होता. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.