मुंबई, पुण्याने वाढविली जळगावची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:35+5:302021-09-08T04:21:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी ज्या ठिकाणाहून जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांची संख्या ...

Mumbai, Pune increase Jalgaon's concern | मुंबई, पुण्याने वाढविली जळगावची चिंता

मुंबई, पुण्याने वाढविली जळगावची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी असली तरी ज्या ठिकाणाहून जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असते, अशा भागांमध्ये रुग्णवाढ समोर येत आहे. त्यातच मुंबईहून प्रवास करून आलेला एक तरुण जळगावात बाधित आढळून आला आहे. बाहेरील जिल्ह्यात रुग्ण वाढतच राहिले तर जळगावातही काही दिवसांत धोका वाढण्याचा एक अंदाज वर्तविला जात आहे. त्यातच नागरिकांचा निष्काळजीपणा हा या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारा ठरू शकतो, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

....तर पंधरा दिवसांत रुग्णवाढ

राज्यभरातील मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ समोर आली आहे. जळगावात सध्या तरी पॉझिटिव्हिटी ही एक टक्क्याच्या खाली आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात ही रुग्णवाढ होत आहे त्या ठिकाणी जाणारे व त्याठिकाणाहून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. शिवाय आता सर्व दळणवळण यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे हा प्रसार होण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यातच आगामी काळात असलेल्या सण उत्सवांमध्ये बाहेरील जिल्ह्यात जाणाऱ्यांची आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आगामी पंधरात ते २० दिवसांत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरी लाट गंभीर का झाली?

- ऑक्टोबरपासून रुग्ण कमी झाल्याने कोरोना गेल्याचा गैरसमज आणि सर्वत्र नियमांचा फज्जा

- मोठ्या प्रमाणावर गर्दीत झालेले लग्न सोहळे.

- ग्रामपंचायतींच्या निवडणुका, निकालाला उसळलेली प्रचंड गर्दी.

- बाजारपेठांमध्ये वावरताना मास्क घालण्याऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आली.

- दोनच महिन्यांत ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आल्याने शासकीय यंत्रणेची तारांबळ.

पहिली लाट,

मार्च : ०१

एप्रिल : ३५

मे : ७१२

जून : २७४५

जुलै : ७६१०

ऑगस्ट : १६४८८

सप्टेंबर : २०५८९

ऑक्टोबर : ५०१३

नोव्हेंबर : १३६८

डिसेंबर १२९४

जानेवारी २०२१ : ११८९

१५ फेबुवारीपर्यंत : ५५७

दुसरी लाट

१५ फेब्रुवारी २०२१ पासून : ३२८७

मार्च : २८१४०

एप्रिल : ३२९८६

मे : १७९८१

जून : २३२४

जुलै : २९२

ऑगस्ट : ९८

पहिल्या लाटेतील उच्चांक

११८५ : ७ सप्टेंबर २०२१

दुसऱ्या लाटेतील उच्चांक

१२२३ : २४ मार्च २०२१

Web Title: Mumbai, Pune increase Jalgaon's concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.