मुक्ताईनगर तालुक्याला पावसाने झोडपले, चार चाकी वाहून पुलात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 09:31 IST2021-06-09T09:31:05+5:302021-06-09T09:31:55+5:30

सुळे येथे नदीला पूर आला.

Muktainagar taluka was lashed by rains, four wheels were carried and stuck in the bridge | मुक्ताईनगर तालुक्याला पावसाने झोडपले, चार चाकी वाहून पुलात अडकले

मुक्ताईनगर तालुक्याला पावसाने झोडपले, चार चाकी वाहून पुलात अडकले


मतीन शेख
मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक भागाला बुधवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान जोरदार पावसाने झोडपून काढले. कुऱ्हा परिसरात अनेक नदी नाल्याना पूर आला. यात सुळे येथील पार्थ नदीला पूर आल्याने नदी काठावर उभी असलेली चारचाकी पिकअप हे वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने काही अंतरावर याच नदीवर असलेल्या लहान पुलात हे वाहन अडकून थांबले.

पहाटेच्या पावसाने परिसरात अनेक लहान मोठे नाल्याना पूर आला. यात कुऱ्हा गावातून वाहणाऱ्या गोरक्ष गंगा नदीलादेखील जोरदार पाणी आल्याने नदीच्या पुलावर व लगतच्या भागातील किरकोळ दुकानांना फटका बसला.

शेती शिवारात धो धो पावसामुळे अनेक शेतांचे बांध देखील वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

सुळे येथील नदीत वाहून गेलेलेले चारचाकी वाहन हे दिनकर इंगळे या ग्रामस्थाचे आहे. नदीला पहाटे पाणी आल्याने नदीकाठी असलेल्या गोठ्यात पाणी शिरल्याने जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले असल्याची माहिती पशुधन मालकांनी दिली. ही प्राथमिक माहिती असली तरी अद्याप परिसरात पावसामुळे कोठे काय नुकसान झाले आहे याची माहिती प्रशासन स्तरावर घेतली जात आहे.

Web Title: Muktainagar taluka was lashed by rains, four wheels were carried and stuck in the bridge