१५ वर्षानंतर लाभला जळगाव शहरातील रस्त्याला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:41 IST2018-02-17T21:40:13+5:302018-02-17T21:41:46+5:30
तरुणांच्या श्रमदानातून १० कॉलन्यांचा खडतर मार्ग झाला सुकर

१५ वर्षानंतर लाभला जळगाव शहरातील रस्त्याला मुहूर्त
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १७ : महामार्गाकडून गणेशपुरी मार्गे मेहरूण परिसराला जोडणाºया रस्त्यावर मुरूम टाकून त्याचे श्रमदानातून सपाटीकरण करण्यात आल्याने सुमारे १० कॉलन्याकडे जाणारा खडतर रस्ता तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुकर झाला आहे.
समाजवादी पार्टीतर्फे शनिवारी श्रमदानातून व लोकसहभागातून अजिंठा चौफुलीनजीक असलेल्या व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील गणेशपुरी ते ममता हॉस्पिटलकडे जाणाºया रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली.
गणेशपुरी मार्गावरून जाण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्याचे श्रमदानातून व लोकसहभागातून दुरूस्ती करण्याचा निर्णय समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. कोअर कमेटीचे अध्यक्ष साजीद शेख यांनी स्वत:च्या खर्चातून या कामासाठी मुरूम, जे.सी.बी. व रोडरोलर उपलब्ध करून देण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी अगोदर रस्त्याची साफसफाई केली. त्यानंतर या ठिकाणी ४ डंबर, ८ ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला. टाकलेला मुरूम पसरवून त्यावर रोडरोलर फिरविल्याने हा रस्ता महामार्गाच्या उंचीपर्यंत आला. त्यामुळे येणाºया-जाणाºयांचा मार्ग सुकर झाला आहे.
या कॉलन्यांची गैरसोय दूर
गणेशपुरी, मास्टर कॉलनी, रामेश्वर नगर, राम नगर, रझा कॉलनी, दत्त नगर, नशेमन कॉलनी, अक्सा नगर, अल्मास नगर, संतोषीमाता नगर आदी कॉलन्यांकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.